
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.२९.-(अभिजीत शिंगटे)- कलासागर अकॅडमी आणि ज्युनिअर कॉलेज वाई येथील विद्यार्थिनी कुमारी दिक्षा दादासाहेब काळे हिने नुकत्याच झालेल्या एच एस सी 2025 च्या परीक्षेत वाई तालुक्यात 91.17% गुणाने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
सध्या स्पर्धात्मक युग चालू आहे आणि या युगात कलासागर अकॅडमी आणि ज्युनिअर कॉलेज वाई येथे मुलांना योग्य ते प्रकारचे शिक्षण शिक्षकांकडून मिळत आहे. या अकॅडमीचे प्रमुख श्री रविराज पांढरे सर आणि हेमंत काळोखे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्री हेमंत काळे, विशाल खर्डे, सविता घाडगे, रूपाली शिंदे, नीलम गोडबोले, पुनम नलावडे, शंकर मोकाशी आदी शिक्षकांच्या योग्य अध्यापन यामुळे तिने हे यश संपादन केले आहे.
या अकॅडमी बरोबरच तिला मोठा भाऊ दीप दादासाहेब काळे याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे दीक्षा हिचे वडील गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड वाई येथे करतात असून त्यांची जनमानसात सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे आणि कलासागर अकॅडमी आणि ज्यनिअर कॉलेज वाई मधील सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी, हितचिंतक आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.