
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.२६. दरवर्षी उष्णतेत मोठी वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे सर्वत्र होणारी वृक्षतोड त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम दिवदेववाडी यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी फळझाडांची लागवड करण्यात आली.

पर्यावरणाचं रक्षण हे केवळ निसर्गाचं नव्हे, तर आपल्या संस्कृतीचं रक्षण हे ब्रिद वाक्य लक्षात घेऊन पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या निर्धार करत दिवदेववाडी गावामध्ये वृक्षप्रेमी ग्रुप व ग्रामस्थ यांच्यावतीने दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते त्याप्रमाणे यावर्षीही रस्त्याच्या दुतर्फा 200 फळझाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा,फणस,चिकू,जांभूळ,वड,पिंपळ अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड संवर्धन मोहीम चे आधारस्तंभ मार्गदर्शक संतोष (दादा) काशिनाथ जुनघरे यांचे मोलाचे सहकार्य केले गावातील तरुण पिढी – मुंबई आणि पुणे येथून विशेषतः येऊन, पर्यावरण रक्षणाच्या उद्दिष्टाने वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला.

मुंबई आणि पुण्यावरून वृक्षारोपणासाठी अनिल तुकाराम जुनघरे, सचिन तुकाराम जुनघरे, राहुल नामदेव जुनघरे(पाटील), आतिश पांडुरंग जुनघरे, प्रफुल्ल मारुती जुनघरे, जयेश जुनघरे विनायक विष्णू जुनघरे, अजय जुनघरे, आकाश जुनघरे, विशाल जुनघरे, मनोज जुनघरे, राजेश जुनघरे अनुप जुनघरे, प्रथमेश जुनघरे, ओम जुनघरे, यश जुनघरे, गौरव जुनघरे, अभिषेक जुनघरे, मधुकर जुनघरे अक्षय जुनघरे, प्रफुल जाधव, प्रणव जुनघरे, शिवनेर धनावडे, अनिकेत जुनघरे, स्वराज जुनघरे, हर्ष अशोक अशोक जुनघरे व हर्ष संतोष जुनघरे उपस्थित होते.

सर्वांनी एकत्र येऊन समर्पण, जिद्द आणि जबाबदारीने हे काम पार पाडलं.याबद्दल सर्व वृक्षप्रेमीचे ग्रामस्थ मंडळ दिवदेववाडी व महिला मंडळ दिवदेववाडी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.