
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा.दि.२६. भगवंताच्या दिव्य तेजाने दशदिशा व्यापून टाकलेली पंढरी ‘याची देही याची डोळा ‘ अनुभवण्यासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकरी नित्य नियमाने पंढरपूरला जात असतात.वारीला जात असलेल्या वारकऱ्यांना श्रीक्षेत्र कुसूंबी येथील श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसूंबी यांच्या वतीने वारकऱ्यांना लोणंद येथे पालखी सोहळ्यात प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे,उपाध्यक्ष विजय वेदे,ग्रुप ग्रामपंचायत कुसूंबीचे सरपंच मारुती चिकणे (बापू), उपसरपंच निर्वत्ती मोरे,तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव चिकणे,(गुरुजी )नेहरू युवा मंडळ कुसूंबीचे कार्यकर्ते,समिर वेंदे,अजय कुंभार,अशोक साळूंखे, राजेंद्र वेंदे यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला.
देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यासाठी देणगी देण्याचे कार्य हाती घेतले जाते, सांप्रदायिक वारसा अखंडपणे सुरू असलेल्या पालखी सोहळ्यात प्रसाद वाटप करुन आध्यात्मिक वारसा जतन केलेल्या देवस्थान ट्रस्टच्या प्रसाद वाटप उपक्रमाचे वारकरी संप्रदाय यांच्या कडून कौतुक होत आहे.