स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——
कास.दि. १६ : जावळी तालुक्यातील एकीव गावच्या हद्दीत धबधब्याच्या जवळ खोल दरीत खाली पडून दोन युवकांचा मृत्यु झाला.
पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक१६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ५/३० वा ते ०६/०० वा.चे सुमारास मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील एकीव धबधबा येथून १५० ते २०० मीटर अंतरावर अक्षय शामराव अंबुले, रा. बसपाची वाडी सातारा व गणेश अंकुश फडतरे, रा. करंजे, सातारा हे त्यांचे इतर दोन मित्र पंकज जयवंत शिंदे, रा. बसपाची वाडी, सातारा व समाधान सुदाम मोरे, रा. बसपाची वाडी, सातारा यांचेसोबत धबधब्याचे ठिकाणी फिरण्यासाठी आले होते.
सदर घटनेच्या ठिकाणी अक्षय अंबवले व गणेश फडतरे यांचे त्या ठिकाणी असलेल्या अनोळखी युवकांशी कोणत्यातरी अज्ञात कारणाने वादावादी झाली.व सदरची घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून मेढा पोलीस स्टेशन येथे कॉल वरून माहिती दिल्याने तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग व मेढा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर सदर दोन युवकांचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांना पाचारण करून त्यांचे मदतीने या दोन्ही मृतदेह खोल दरीतुन शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले.पहाटे दरम्यान यातील मयत युवक गणेश फडतरे यांचा मृतदेह वर काढण्यात यश आले. परंतु दुसऱ्या युवकाचा अंधार,अति पाऊस व घनदाट जंगलामुळे मृतदेह काढणे अवघड झाले होते. त्यामुळे सदर रेस्क्यू मोहीम उजेड पडल्यानंतर शोध सुरु केला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजताच्या दरम्यान अक्षय अंबवले याचा मृतदेह वर काढण्यात यश आले.
सदर पोलीस स्टाफ, रेस्कू टीम, स्थानिक लोक व मृतांचे नातेवाईक यांचे सोबत पूर्ण 20/22 तास मृतांचा तपास सुरू होता. दोन्ही मृतदेहाचे पोस्टमार्टम करून युवकांचा मित्र पंकज शिंदे याचे फिर्यादीवरून मेढा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींवर भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर हे करीत आहेत.
प्रसिद्ध असलेल्या कास परिसरातील एकीव धबधब्यावर पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटक तसेच सातरकरांची गर्दी होऊ लागली होती.
हा धबधबा पाहण्यासाठी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गर्दी होत असल्याने झालेल्या अनुचित प्रकारामुळे स्थानिक तसेच पर्यटकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी केले असून.गर्दीच्या वेळेस या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येत होता,आणि आत्ता बंदोबस्ताचे प्रमाण ही वाढवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले.