बेलावडे,आर्डे,नेवेकरवाडी जि.प.शाळांमध्ये वह्या व पेन वाटप करत किरण बगाडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——-
कुडाळ. दि.१६ . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तर तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले होते. त्याच उक्तीप्रमाणे तळागाळातील गरजू,गरीब विद्यार्थी शिकुन मोठा होऊन त्याला शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे .शिक्षण शिकण्याची इच्छा असूनही काही मुलांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही. तसेच चांगले शिक्षण घेतल्यामुळे शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले पाहिजे.यासाठीच सामाजिक बांधिलकी जोपासत सलग चौथे वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे,आर्डे व नेवेकरवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील मुलांना स्व:खर्चाने मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले.
बेलावडे शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षक तत्कालीन धुमाळ सर यांच्या निरोप समारंभ प्रसंगी तसेच नुकतीच ज्योती लघु चित्रपटांमध्ये जिल्हा सचिव आयु किरण बगाडे यांची छोटी कन्या बालकलाकार प्रतीक्षा बगाडे हिला मुंबई व महाबळेश्वर या ठिकाणी लघु चित्रपट मध्ये उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याच अनुषंगाने तिचा सत्कार बेलावडे शाळेच्या वतीने करण्यात आला.यावेळी किरण बगाडे यांनी शाळेच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,पेन वाटप केले.त्यावेळी जिल्हा सचिव किरण बगाडे,मुख्याध्यापक दळवी मॅडम,पालकर मॅडम, धुमाळ सर,अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे,संतोष बगाडे,रिटायर्ड शिंदे सर तसेच आर्डे शाळेतील मुख्याध्यापक भोसले सर,अंगणवाडी सेविका तसेच आरडे गावच्या विद्यमान सरपंच हौसाबाई जाधव, दादा रोकडे, पोपट जाधव,तसेच ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
तसेच किरण बगाडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्डे मध्ये ही संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन वाटप ,विद्यार्थि उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवेकरवाडी ता.जावळी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मोहिते सर व रोकडे सर तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.