राजेवाडी येथे गोवंश हत्या, महाड मध्ये तणावपूर्ण शांतता !
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- डीवायएसपी शंकर काळे यांचे आवाहन!

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
पोलीस प्रशासन मार्फत संबंधितांविरोधा कारवाई चे संकेत !
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- डीवायएसपी शंकर काळे यांचे आवाहन!राजेवाडीसह महाड मधील परिस्थिती नियंत्रणाखाली!
सातारा दि.३१ प्रतिनिधी. मोहन जगताप यांजकडून महाड तालुक्यातील राजेवाडी येथे गाईची खुले आम कत्तल करण्यात आली या ठिकाणी गोरक्ष यांना माहिती मिळताच गो हत्या करू नका असे सांगत असताना गोरक्ष यांना गावातील इतर नागरिकांना बोलवून घेरण्यात आल्या नंतर गो रक्षक यांना सोडविण्या साठी गेलेल्या काही नागरिकांना पत्रकार सह एका पोलीस कर्मचारी यास मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्री च्या सुमारास घडली .
गुरुवारी सकाळी गोरक्षक व समस्त गोमाता प्रेमी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत कायदा सुव्यवस्था मध्ये बाधा येणार नाही असे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस विभागीय अधिकारी श्री शंकर काळे यांनी केले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट केले महाड शहरात तसेच राजेवाडी परिसरामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातील राजेवाडी गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास 3 मुक्या जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती महाड पोलादपूर मधील गो रक्षक यांना मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली झाल्या प्रकारची गंभीर नोंद घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान रायगडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने महाडला भेट देण्यासाठी येणार असल्याचे डीवायएसपी श्रीशंकर काळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नागरिकांनी शहरात होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता मिळणाऱ्या बातम्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत डीवायएसपी श्री काळे यांनी जनतेला केले आहे तालुक्यात सद्यस्थितीमध्ये संपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे.