
स्टार ११ महाराष्ट्र
केळघर.दि.११.व्यावसायिक वाद राग मनात धरुन सिकंदर इस्माईल मोमीन व भाऊ मुसा यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सातारा ते महाबळेश्वर जाणारे रोडवर केळघर घाटामध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर इस्माईल मोमीन राहणार.चाफळ तालुका पाटण व त्याचा भाऊ मुसा यास व्यावसायिक वाद राग मनात धरुन शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विनोद तुपे राहणार कराड व त्याच्या सोबतचे तीन अनोळखी इसम यांनी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली म्हणून त्याच्याविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याप्रकरणी मेढा पोलिसांनी 107/2025 BNS 109,115(2),352,351(2)(3) ,3(5) या प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.