स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा.दि.२३. रिटकवली ता जावली गावचे हद्दीतून देशी दारूची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक होणार असल्याची निश्चित खबर मिळाल्याने सपोनि संतोष तासगांवकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून देशी विदेशी दारूची वाहतुक करणारी रिक्षा असा एकुन १,१४,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूची विक्री करण्याचे उद्देशान वाहतुक करणा-या दोघांविरूद्ध मेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सपोनि श्री संतोष तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली,सहा पो फौ शिंगटे पो.कॅा.काळे,पो.कॅा.वाघमळे, पो.कॅा.वाघमळे यांनी सदरची कारवाई केली.
कुडाळ येथील मटका जुगार अड्ड्यावर छापा
कुडाळ ता जावली गावचे हद्दीत असले जंगम हॅास्पीटलचे इमारतीचे आडोश्यास एक इसम मटका जुगार चालवित आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनि श्री संतोष तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली,कुडाळ पोलीस दुरक्षेत्राचे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकून मटका जुगार घेणाऱ्या इसमास व जुगार साहीत्य रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ७,९१२/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर कारवाई पो.हवा.शिंदे पो.ना.कचरे,पो.कॅा.देशमुख यांनी केली