क्राईमसातारा

अवघ्या बारा तासात चोरीच्या गुन्ह्याचा मेढा पोलिसांनी लावला छडा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा / प्रतिनिधी

     मेढा.दि.०८.जावली तालुक्यातील कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा सखाराम शेवते यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने  सोन्याचे दागिने व रोख पैशासह तीन लाख तीस हजारांचा डल्ला मारला होता.या घरफोडीचा छडा पोलिसांनी फक्त बारा तासात लावला असून शेवते यांच्या मुलगा निलेश यानेच ही घरफोडी केल्याची उकल करून दिवट्या मुलाला अटक केली आहे त्याला न्यायालयाने ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


       याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ येथील कृष्णा शेवते यांच्या राहते बंद घराचे दरवाज्याचे कुलूप काढून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घराचे भिंतीतील लाकडी कपाताचा कडी कोयंडा काढून कपाटातील पाच तोळे वजनाची  सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असे एकूण ८०,००० रू रोख रक्कम असा ३,३०,००० रू. किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरुन नेला होता.याबाबतची तक्रार शेवते यांनी पोलिसात दाखल केली होती.गुन्ह्याच्या अनुशंगाने सखोल तपास करत असताना ही घरफोडी शेवते यांचा घरातून विभक्त राहणारा मुलगा निलेश कृष्णात शेवते याने केला असल्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आलेला आहे.


          आरोपी निलेश याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम ५५,५०० रू.असा एकुन ३,३०,००० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


           सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली केली या कारवाईत सपोनि पृथ्वीराज ताटे,सहा.पोलीस फौजदार विकास गंगावणे,विजय शिंगटे,
पो.हवा.डी.जी.शिंदे,पी.डी.माने,पो.कॅा.आर. टी.शेख,सनी काळे,अभिजित वाघमळे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!