क्राईमजावली

लाकुड वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेढा वनविभागाची कारवाई

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा.दि.१७.जावली तालुक्यातील खर्शी-बारामुरे रोडवर विना परवाना वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर लाकूड मालासह जप्त करत वनविभागाने कारवाई केली.

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार खर्शी-बारामुरे रोडवर विनापरवाना वृक्षतोड करुन करंज प्रजातीचे जळावू लाकुड मालाची वाहतुक करीत असणारा ट्रॅक्टर वाहन क्र-MH-11-BA-9809 जप्त करुन अमोल दत्तात्रय लोहार रा. करहर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सातारा जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारव्दाज व सहा.वनसंरक्षक महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गंबरे, वनपाल रझिया शेख, वनरक्षक संगिता शेळके, वनरक्षक एस. डी. चौगुले, वनरक्षक अनुजा काळे, व कर्मचारी वर्ग यांनी केली असून पुढील तपास करण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय मेढा येथे वाहन चौकशीसाठी आणले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!