क्राईमसातारा

मेढा पोलिस ॲक्शन मोडवर.. दारु व मटका अड्ड्यावर धडक कारवाई

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा. दि.३०. मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाई करत एकूण रोखड व मुद्देमाल मेढा पोलिसांनी जप्त केला.सातारा एल.सी.पी कार्यालय येथून मेढा येथील पोलिस स्टेशनला नुकतेच हजर झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईने जावली तालुक्यातील अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे.

जावली तालुक्यात अवैध दारू व मटका व्यावसायिकांना सज्जड इशारा


मौजे सोनगाव, ता.जावली गावचे हद्दीमध्ये उमेश लालासो सोनावणे रा.कुडाळ ता.जावली बेकायदेशीर, दारुची चोरटी विक्री करीत असताना त्याकडील मुद्देमाल जप्त करून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.दिनांक. २७/०१/२०२५ रोजी मौजे वाघेश्वर ता.जावली येथे प्रशांत यशवंत रणखांबे रा.शाहुपुरी सातारा,याच्याकडे दारुची चोरटी विक्री करणेच्या उद्देशाने त्याकडील मुद्देमाल जप्त करून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.दिनांक २८/०१/२०२५ रोजी मौजे कुडाळ ता.जावली गावचे हद्दित स्वप्निल रामदास वारागडे रा.कुडाळ ता.जावली मटका जुगार घेत असताना याच्याकडे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

दिनांक.२९/०१/२०२५ रोजी मेढा ता जावली गावच्या हद्दीत गजानन सदाशिव तांबोळी रा.मेढा ता जावली दारू विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील असलेला मुद्देमाल जप्त करून याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अवैध व्यावसायिकांवर कारवाई करत एकूण रोखड व ७९९० रुपयेचा मुद्देमाल मेढा पोलिसांनी जप्त केला.

जावली तालुक्यात अवैध दारू विक्रीसह गुटखा, मटका, ताडी, जुगार आदी धंदेही जोमाने फोफावल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.यासाठी लवकरच अवैध व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करणार असून मोठ्या अवैध व्यावसायिकांचा पर्दाफाश करणार

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधिर पाटील

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!