
परिसरात,गावात अनोळखी व्यक्ती फिरत असताना दिसल्यास जवळच्या पोलिसांशी संपर्क करण्याचे नागरिकांना आवाहन….. स.पो.नि सुधिर पाटील
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.०१. सायगांव ता.जावली येथील स्नॅक्स सेंटर येथे अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रक्कम,लोखंडी तिजोरी सह मोबाईल फोन असा एकुण १८,३००/- रूपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेले बाबत मेढा पोलीस ठाणे येथे सचिन प्रकाश ससाणे यांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
सदर घटनेच्या संदर्भाने स.पो.नि सुधिर पाटील यांनी गुन्ह्याचे तपासा दरम्याण मिळाले माहीतीचे आधारे संशयित इसम आदित्य विकास चव्हाण रा. सायगांव ता. जावली यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचेकडून चोरून नेलेल्या रक्कमे पैकी ५,०००/- रोख रक्कम, १,०००/- रू. किमतीचा मोबाईल फोन, व ३००/- रू.किमतीची लोखंडी तिजोरी, व कागदपत्रे असा एकूण ६,३००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीस पकडण्यात यश मिळवले.
सदर कारवाई मध्ये मेढा पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,पोलीस उप-निरीक्षक गंगावणे, सहा.पोलीस फौजदार शिंगटे, पो.हवा.माळी पो.ना. शेख ,पो.ना.रोकडे,पो.कॉ.वाघमळे, पोकॉ. काळे, पो.कॉ. वाघमळे यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला होता. गुन्ह्याचा तपास पो.ना.शेख करीत आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक, वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम,यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधिर पाटील, कारवाई मध्ये सहभागी अधिकारी,अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
जावली तालुक्यातील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन चोरी,घरफोडी,दरोडा,जबरी चोरी या सारखे गंभीर गुन्हे घडू नयेत,यासाठी आपल्या परिसरात,गावात कोणी अनोळखी व्यक्ती फिरत असेल तर गावातील सरपंच, पोलिस पाटील किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी नागरिकांना केले आहे.