
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
जावली, सातारा – महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या जावली तालुक्याच्या अध्यक्षपदी श्री. सुहास भोसले (खर्शी तर्फ कुडाळ) यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी उपाध्यक्षपदासाठी श्री. संतोष भिलारे (शेते) आणि श्री. धनाजी सपकाळ (बामनोली) यांची निवड झाली. सचिवपदासाठी श्री. तुषार जुनघरे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.सदस्य म्हणून श्री. एकनाथ सुतारा (कुसुंबी), सौ. प्रियांका गायकवाड (मोरघर), श्री. ज्ञानेश्वर सावंत (भामगर), श्री. भिमराव परिहार (बिभवी), व श्री. बाजीराव सुर्वे (डांगरे घर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सुहास भोसले यांच्या सच्च्या नेतृत्वगुणांमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे संघटना अधिक बळकट व एकसंघ होईल, असा विश्वास संघटनेत व्यक्त करण्यात आला. पोलीस पाटील बांधवांच्या अडचणी सोडवण्यात व त्यांच्या हितासाठी काम करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, त्यांच्या कार्याची तालुक्यात सर्वत्र प्रशंसा होत आहे.