
स्टार११महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी — युवराज धुमाळ
मेढा दि.१७. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 10 व 11 जुलै 2013 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प जावली वआमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 10 व 11 जुलै 2013 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थीनींकरिता ‘राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर’ आयोजीत करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ.अशोक व्ही गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ संजीवनी देशपांडे तसेच मेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मा.अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या. त्या देत असताना ते म्हणाले ” विद्यार्थी जीवनात कठिण प्रसंगाला सामोरे जाताना स्वशिस्तीची आवश्यकता आहे आणि स्वशिस्तीची जाणीव होण्याकरिता अशा स्वरूपाच्या शिबिरांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर सौ.संजीवनी देशपांडे यांनी “युवतींनी दैनंदिन आयुष्यात येणार्या प्रसंगांना धैर्याने कसे सामोरे जायचे हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.यानंतर मा.अश्विनी पाटील यांनी स्वानुभवातून अनेक घटनांचे विश्लेषण करून विद्यार्थिनींना सातत्याने सजग राहण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या दुसर्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मा. श्री.अविनाश गोंधळी, संचालक व प्रशिक्षक, रेनबुकान कराटे दोअसोसिएशन,महाराष्ट्र यांनी कराटे मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक बालविकास प्रकल्प जावलीच्या सौ मानसी संकपाळ यांनी केले तर सूत्रसंचालन सौ मनीषा पवार यांनी केले.
या शिबिरात महाविद्यालयातील 150 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शेवटी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गायत्री जाधव यांनी उपस्थीतांचे आभार मानले.