
स्टार११महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-
मेढा दि.१७. महाविद्यालयातील विध्यार्थी व विध्यार्थ्यांच्या कल्याणासाठी,राज्य परिवहन महामंडळाने विविध योजना,उपक्रम राबवण्याचे ठरवले आहेत.महामंडळाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिळणाऱ्या विविध सोयी सवलती आहेत.तरी एस टी महामंडळाच्या या विविध योजनांचा फायदा विध्यार्थ्यांनी घ्यावा ” असे मत मेढा महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाच्या आगारप्रमुख सौ.नीता बाबर यांनी व्यक्त केले.
मेढा येथील महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या वतीने,जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील आकरावी – बारावीच्या विध्यार्थीनींन एस टी महामंडळाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिळणाऱ्या विविध सोयी सवलती व प्रवासी पास संदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी सदिच्छा भेट दिली.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक श्री.अजित मुगडे श्री सागर तरडे ,श्री अमर पवार व महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या, ” मेढा बस आगारामध्ये विविध सामाजिक उपक्रम चालू आहेत.त्याची माहीती घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिळणाऱ्या विविध सोयी सवलती व प्रवासी पास योजनेचा लाभ घ्यावा ” असे त्यांनी आवाहन केले व सर्व माहिती दिली.कार्यक्रमाचे शेवटी माननीय प्राचार्य,उपप्राचार्य व आगार व्यवस्थापक श्रीमती नीता बाबर यांचे शुभ हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणारे मोफत प्रवासी पास चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.संतोष कदम यांनी केले.यावेळी कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.शेवटी प्रा.संध्या निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.