स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा, दि . २० : सातारा येथील रहिवाशी व मूळ गाव खर्शी ता.जावळी गावची सुपुत्री डॉ नेहा अशोक भिसे हिने ICMR NIV (राष्ट्रीय विष्णु संशोधन संस्था पुणे) येथून पीएचडी करून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे. याबदल तिचे अनेकांनी आभिनंदन केले आहे .
डॉ नेहा अशोक भिसे हिने पीएचडी करिता HIPATITIS C VIRUS या विषया मध्ये संशोधनात्मक काम केले आहे.
या विषयातील पीएचडी अभ्यासक्रमा करिता शास्त्रज्ञा डॉ. कविता लोळे ( ICMR NIV ) विभाग प्रमुख यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केलेले आहे.
नेहा अशोक भिसे या सातारा मधील डॉ अशोक कृष्णा भिसे प्रसूती व स्त्रिरोग तज्ञ याची जेष्ठ कन्या आहे. डॉ ए के भिसे हे मेढा येथे वैदकिय अक्षीधक म्हणून काम केले असून ते सेवानिवृत्त झाले आहेत .तिला उच्च शिक्षणात डॉ भिसे परिवार यांनी मोलाचा पाठिंबा दिला आहे. नेहा भिसे यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याने त्यांचे नातेवाईक , मित्रमंडळी व इतर सर्व स्तरावरील सहकार्यांचा कडून तिचे कौतुकव अभिनंदन होत आहे .