स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
मेढा.दि.२०. मेढा शहरात ग्रामस्थांच्या सहकार्याने व्यसनमुक्त युवक संघाने दारूची उभी बाटली आडवी केली मात्र गेली पंधरा वर्षे झाली आडवी बाटली असली तरी तालुक्यात अवैध दारूचा महापूर वहात असून दारू बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व युवापिढी झटपट पैसे मिळवण्यासाठी अवैध दारू विक्रीकडे वळत आहेत उलट दारू बंद असल्याने नुकसानच होत असल्याने मेढ्यातील आडवी बाटली उभी करावी अशी मागणी मेढा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की डिसेंबर २००७ मध्ये मेढा शहरात ग्रामपंचायत असताना मतदानाने दारूची उभी बाटली आडवी केली आता मेढा नगरपंचायत झाली असून नगरपंचायतीला ग्रामपंचायत कायदा लागू होत नाही म्हणून नगरपंचायत कायद्यानुसार मेढा शहरातील शासनमान्य परवाना धारक दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात यावीत याबाबत मेढा शहरात पंचक्रोशीतील नागरिकांनी बैठक घेऊन परवाना धारक दारू दुकाने सुरू करण्यासाठी एकमुखाने ठराव घेतला आहे आपण त्या खात्याचे मंत्री असल्याने लक्ष घालून ही दुकानं पुन्हा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक, मेढा नगरपंचायत आदींना देण्यात आल्या आहेत हे निवेदन देण्यासाठी माजी जि प सदस्य मच्छीन्द्र क्षिरसागर, माजी उपसभापती कांतिभाई देशमुख,माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ,माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार,माजी नगरसेवक नारायण देशमुख,सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ,संतोष वारागडे आदी मान्यवर उपस्थित होते.