
मेढा दि .२३. जानेवारीयेथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये पारंपारिक दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.

या दिनाचे औचित्य साधून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील कला,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी विध्यार्थ्यांनी विविध पारंपरीक व आधुनिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीतीलअनेक सण व उत्सव यावर आधारित स्वगते, लघुनाटिका व काही गाणी सादर करून भारतीय व महाराष्ट्र राज्यातील सांस्कृतिक दर्शन घडवले.याशिवाय काही थोर महापुरुषांच्या व्यक्तीरेखा सकारून त्यांचे विचार सर्वांसमोर मांडले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ .अशोक गिरी यांच्या अध्यक्षपदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले व भारतीय कला, साहित्य, सण, उत्सव यांचे सादरीकरण करण्याबरोबरच भारतीय भाषा,गाणी व संस्कृतीचे अनुकरण करून आपली राष्ट्रीय एकात्मता आबाधित राखावी असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे हा पारंपरीक दिन आनंदी व उत्साही व जल्लोषी वातावरणात संपन्न झाला.