शैक्षणिकसातारा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —-

मेढा दि .२ जुलै रोजी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम माननीय मेजर डॉ. अशोक गिरी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .

सालाबाद प्रमाणे इयत्ता अकरावीच्या कला वाणिज्य व विज्ञान विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष कदम यांनी केले . यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक व प्राचार्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये अकरावी – बारावीचे वर्ष कसे कलाटणी देणारे आहे . याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले .

यावेळी वर्षभर कॉलेज स्तरावरील सर्व शैक्षणिक उपक्रमा विषयी माहिती दिली . त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या वैयक्तिक प्रगतीचा आलेख कसा उंचवावा .याविषयी विद्यार्थ्यांची हितगुज केले त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या व
कार्यक्रमाचा समारोप झाला .

यावेळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मर्ढेकर हिने मानले तर आभार सेजल महाडीक हिने मानले .

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!