
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.०९. महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील 105 गाव समाज व्यवस्था फार जुनी आणि समाज हिताची आहे. या समाज व्यवस्थेला इतिहास आहे. ही समाज व्यवस्था अधिक समृद्ध करण्यासठी 32 गाव समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीना एकाच व्यासपीठावर आणून एक चागल्या विचारांची साखळी तयार व्हावी व समाज बांधव यांचे मोठ्या संख्येने एकत्रीकरणं करून तरुणांना सामाजिक कामाची आवड निर्माण व्हावी यासाठी सोळशी उत्सवाचे आयोजन 32 गाव समाजाच्या वतीने करण्यात आले होते.
समाजात आजपर्यंत उल्लेखनीय काम करणाऱ्या दिवंगत समाजबांधवांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. अशा दिवंगत समाज सेवकांना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार देऊन त्याच्या नातेवाईक व ग्रामस्थ यांना सन्मानित करण्यात आले. तर आजही काही अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेले समाज कार्यकर्ते समाज व्यवस्थेत भरीव काम करत आहेत त्यांना ३२ गाव समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा, शेती, सांस्कृतिक , उद्योजगता आणि इतर क्षेत्रातही उल्लेखनीय काम करून समाजापुढे आदर्श उभा केला आहे अशा लोकांचा समाज रत्न हा पुरस्कार देण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी आमदार दगडू दादा सकपाळ, सभापती संजय गायकवाड, श्री बाबुराव सकपाळ,१०५ चे अध्यक्ष घनश्याम सकपाळ, श्री धोंडिबा धनावडे, जितेंद्र दगडूदादा सपकाळ,वसंतशेठ शिंदे,अध्यक्ष धोंडिबा महाराज सकपाळ आदी या सन्मान सोहळ्यात हजारो समाज बांधब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
३२ गाव समाजाचे सुपुत्र माजी आमदार श्री दगडू दादा सकपाळ यांनी मी या समाजाचा घटक आहे याचा मला अभिमान आहे. मला समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत केले हे समाजाचे ऋण आयुष्यभर स्मरणात ठेवीन. आणि समाजाच्या उत्कर्षासाठी कठिबद्ध राहीन असे मत व्यक्त केले.
श्री संजय गायकवाड सभापती महाबळेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजव्यस्थेचा कणा असलेलया सर्व बाबीना स्पर्श केला. आणि सामाजिक बांधिलकी जपत समाज व्यवस्था सदृढ करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
श्री धोंडिबा शेठ धनावडे यांनी या उत्सवाचे आयोजन का आणि कशासाठी याचे उत्तम आणि मुद्देसूद प्रास्ताविक केले.श्री सुदर्शन इंगळे आणि श्री सुनील नारायण जाधव गुरुजी सौंदरी यांनी समाज व्यवस्था टिकवण्यासाठी आपली भूमिका काय असावी हा विषय मांडत असताना कुटुंबसंस्था,लग्नसंस्था, शिक्षण संस्था, धर्मसंस्था आणि राजसंस्था विषयावर प्रभावीपणे} प्रबोधनात्मक विचार मांडले. श्री बाबुराव दादा सकपाळ यांनी समाज व्यवस्थेचे महत्त्व विशद करून ही व्यवस्था सबल करण्यासाठी तरुणांनी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले.
३२ गाव समाजाचे अध्यक्ष ह.भ.प श्री धोंडिबा महाराज सकपाळ यांनी समाजाचा पुढील आव्हाने आणि त्यावर समाज बांधवांनी संघटित होऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे आपण समाजबांधव सक्षमतेने ही आव्हाने पेलू याची ग्वाही देत समाजबधवांना आश्वाशीत केले.
हा उत्सव नियोजनबद्द पद्धतीने संपन्न होण्यासाठी अध्यक्ष धोंडिबा महाराज, सचिव संजय संकपाळ गुरुजी, उपाध्यक्ष कोंडीबा कदम, खजिनदार अरुण कदम गुरुजी यांच्या समवेत श्री संतोष मोरे, श्री सागर कदम, श्री विठ्ठल धनावडे, श्री आनंद धनावडे, आणि श्री संतोष शिंदे, श्री शाम चोरगे, संतोष कदम, श्री सखाराम मालुसरे बाळकृष्ण कदम, बाबुराब भोसले, अरविंद कदम हे सर्व गुरुजन अशा तरुण समाजबांधवांनी मोलाचे योगदान दिले. तर खांबील चोरगे ग्रामस्थांनी मंदीर परिसरात मंडप ,पाणी आणि भोजन याची व्यवस्था उत्तम केली होती.गावप्रतिनिधी यांनी कार्यक्रमाच्या जनजागृती साठी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय संकपाळ गुरुजी व श्री संतोष शिंदे गुरुजी यांनी आपल्या अमोघ वाणीने केले.तर कार्यक्रमाचे आभार श्री संतोष कदम गुरुजी यांनी मानले.



