
स्टार ११ महाराष्ट्र – युवराज धुमाळ
केळघर दि.०८. हैदराबाद येथील सी.एस.आई.आर. च्या सेंटर फॉर सेल अँड मोलेक्युलर बायोलॉजी संस्थेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. कार्तिकेयन वासुदेवन यांनी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. ओमकार यादव यांनी केली. आभार कु. अनिकेत परिहार याने मानले. प्राचार्य डॉ प्रमोद घाटगे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. उपस्थिती डॉ. उदय पवार, श्रीमती. धनश्री देशमुख, प्रा. पांडुरंग पाटील, प्रा. सुनील केमदारणे, श्रीमती. आश्र्विनी भिलारे आणि इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.



