स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क युवराज धुमाळ
केळघर दि.०४ जून महिन्याच्या समाप्ती नंतर गेल्या दोन दिवसात पडणाऱ्या संतत धार पावसामुळे सातारा महाबळेश्र्वर रस्त्यावरील केळघर गावाच्या शेजारी ओढ्यापुलाच्या शेजारील वाहतुकीच्या रस्त्याच्या भरावाला दोन्ही बाजूस मोठ्या चिरा पडल्या असून या भरावा खालील जमीन खचली आहे.
रोड सोलुशन कंपनीच्या हलगर्जी पणामुळे विटा महाबळेश्वर रस्त्याचे सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण न केल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांना अत्यंत धोकेदायक परिस्थितीतून प्रवास करावा लागतो.तसेच आजूबाजूच्या गावातून रोज शाळकरी मुलांना,तसेच बाजारसाठी लोकांना येथूनच प्रवास करावा लागतो,या पुलाच्या दोन्ही बाजूला अद्याप संरक्षण कठडे ही बांधण्यात नाआलेने शाळकरी मुलांना आपला जीव मुठीत धरून येथून पुलावरून पायी ये जा करावे लागते, रस्ता खचल्याने येथे धोक्याचे रिफ्लेक्टर ही बसविण्यात आलेले नसून रात्रीच्या वेळेस वाहनांना प्रवास करताना धोका निर्माण होऊ शकतो.
अन
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले विटा महाबळेश्र्वर रोडचे आत्ता पर्यंत झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून केळघर घाटातील तसेच अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या कामाचे अनुभव येथिल नागरिकांना चांगलेच आलेत,सुरु असलेल्या रस्त्याचे व नाल्यांची कामे संथ गतीने सुरू असून गत वर्षी अतिवृष्टीमुळे केळघर घाटातील झालेल्या नुकसान चे गांभीर्य लक्षात घेता या वर्षी रोड सोलुशन कंपनी व बांधकाम विभाग यांच्यावतीने केळघर घाटामध्ये कोणत्याही पद्धतीची खबरदारी घेतल्याची दिसत नाही.
तसेच मेढा व केळघर बाजार पेठे मधिल कामे रस्त्याची व नाल्याची कामे अजूनही रेंगाळत पडली असून ठिकठिकाणी नाल्यातून पाणी न वाहता ते रस्त्याने वाहताना दिसत आहे,सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्षपणा न करता या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढे दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे असे येथिल स्थानिक ग्रामस्थांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे.



