महाराष्ट्रसातारासामाजिक

जावळीतील पायी दिंडी सावळ्या विठुरायाच्या पंढरपुरात दाखल

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे
मेढा. दि.०९. ॥ टाळी वाजवावी गुढी उभारावी ,वाट ही चालावी पंढरीची ॥भगवान पांडुरंगाचा गजर करत जावळीतील वारकरी टाळकरी अबालवृद् तरुण गेली वीस दिवस आळंदी ते पंढरपुर विश्वंभर बाबा आषाढी दिंडीत पायी चालत आहेत तहान भुक ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता हरीनामात तल्लीन होवून दिंडी सोहळ्यात सहभागी झालेत.

जावळी मेढा विभागातुन विश्वंभर बाबा दिंडी सन 1995 सालापासुन वै.गुरूवर्य ह भ प भिकोबा महाराज देशमुख यांनी सुरु केली.आज माऊलींच्या पालखी सोहळ्यात ही दिंडी गेली २७ वर्षांपासून सुरु आहे.सर्व सामान्य समाज व्यसनाधीन होऊ नये व सन्मार्गाला लागावा हि वै.भिकोबा महाराजांची मनोमन तीव्र इच्छा होती त्यावेळी त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या सुविद्य पत्नी वै ह भ प अनुसया आत्याची . अनुसया आत्यामुळेच आज महीला या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थीत आहेत विणेकरी म्हणून मामुर्डीचे शिवराम मोरे भगवंताची सेवा करत आहेत दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांना पवीत्र तुळशीची माळ घालून वारकरी सांप्रदायाची दिक्षा देण्याचे काम भिकोबा महाराज देशमुख यांनी केले.विश्वंभर बाबा हे जावळीचे तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज होते. विश्वंभर बाबा हे मुळचे जावळीचे असल्याने महाराजांनी त्यांच्या नावाने दिंडी सोहळा स्थापन केला.

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान मध्ये दिंडी सोहळ्याचे रजिस्टर नोंदणी केली.आज हा दिंडी सोहळा माऊलींच्या सोहळ्यात रथाच्या मागे १६७ क्रमांकावर चालत आहे.या सोहळ्यात सातारा जिल्ह्याचा समावेश होतो तसेच या सोहळ्यात मेढा या विभागाचा जास्तीत जास्त सहभाग आहे या दिंडी सोहळ्यात सर्व अन्नदाते आर्थिक व धान्य स्वरूपात या दिंडीला सहकार्य करतात.आज त्यांची ही आध्यात्मिक परंपरा त्यांचे नातू ह भ प गुरूवर्य अतुलजी महाराज देशमुख सांभाळत आहेत व पुढेही ही परंपरा चालू रहावी यासाठी विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था जावळीची राजधानी मेढा या ठिकाणी कार्यरत आहे. या दिंडी सोहळ्यात अध्यक्ष बबन धनावडे तुकाराम देशमुख ज्ञानदेव भाऊ धनावडे विलास आबा पवार चंद्रकांत भाऊ जवळ गाडे ताई तसेच जावळीची राजधानी मेढा नगरीच्या ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभते
तसेच श्री क्षेत्र मेरूलींग पंचक्रोशी दिंडी सोहळ्यास हैबतबाबा यांनी १९२७ साली मेरूलींग येथून दिंडीला प्रारंभ केला .सन १९९८ पासून ह.भ.प. दत्तात्रय महाराज साबळे यांचे मार्गदर्शना खाली व ह.भ.प.चंद्रभागा ताई पिसाळ यांचे नेतृत्वाखाली दिंडी सोहळा होत आहे . दिंडी सोहळ्यात ह.भ.प.विष्णू भाऊ शिवणकर,मनोहर भोसले, नंदकुमार साबळे,दगडू शेलाटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभते. दिंडी सोहळ्या मार्फत आळंदी व पंढरपूर या दोन्ही पायी वारी चालू आहेत, पंढरपूर वारी ही पुसेगाव मार्गे जाते, या वारीचे मेरूलींग येथून प्रस्थान होत असते.ब्रम्हचैतन्य सद्गुरु तात्या महाराज रेवडीकर आण्णा यांचे आशिर्वादाने चालत आलेल्या या वारीतअनेक दाते तन मन धनाने सहकार्य करतात. तसेच जावळी तालुक्याचे सर्व ह भ प विजय महाराज शेलार सुभाष महाराज मिस्त्री अशोक महाराज शेलार हणमंत महाराज पार्टे यांचा ही सहभाग या दिंडी मध्ये असतो


 या वर्षी परमात्मा पांडुरंगाच्या महापुजेचा मान जावळीचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे हस्ते होणार असलेने जावळीतील वारकरी टाळकरी भजनी मंडळे तसेच सर्व  जावळीकरांना हा पुजेचा मान म्हणजे भगवान पांडुरंगाचा जावळीकरांना मिळालेला प्रसाद आहे त्यामुळे जावळीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे 

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!