महाराष्ट्रराजकीयसातारा

एकनाथांच्या भेटीला लोटली मायभूमि 

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – मोहन जगताप 

 

सातारा. दि.२९.गत महिन्यात राज्याच्या राजकारणात बलाढ्य शक्तीच्या व शासनाच्या लोकानी शासनाच्या विरोधात जाण्याचे धाडस ठाणेस्थित मंत्री महोदय ना. एकनाथ शिंदे यांनी सूरतवरुण गुवाहाटी गाठून महाराष्ट्र राज्याच्या राजकीय भूकंपाचा केंद्र बिंदु झालेले मूळ जावली तालुक्यातील दरें तर्फ तांब गावचे रहिवासी असलेल्या या राजकिय धुरंधर व्यक्तीने देशातच नव्हे तर जगातील अनेक ठिकाणी या बंडखोरीची दखल घेत विविध प्रतिक्रिया दिल्या.          सर्वसामान्य कुटुंबातील एका कष्टकरी शेतकर्‍यांच्या मुलाने ठाण्यासारख्या शहरातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या कृपा आशिर्वादाणे राजकीय सारी पाटाचे धडे घेवून दिघे पश्चात्य त्यांच्या विचारांची शिदोरी ठाण्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या गुरूंचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी देह चंदना प्रमाणे झिजवून राज्या बरोबरच आपल्या माय भूमिवरील मातीत नेहमीच जमिनीवर पाय असणार्‍या ना एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीने महाराष्ट्रात जबरदस्त असा राजकीय हंगामा करून आपल्या हिंदुत्व या मुद्द्यावरून राज्य पातळीवरील सर्वोच्च मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी व विचारवंत यांनी त्याच्या या विचारांचा विश्वासाने पाठींबा दिला.

जावलीच्या कधीही स्वप्नात न पाहिलेला मुख्यमंत्री एकनाथांच्या कृपेने आज जावलीकरानी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री पाहिला त्यांच्या भेटीसाठी आज महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाण्याआधी ठाण्याच्या नंदनवन या निवासस्थानी मायभूमितील नातलगांना व मित्र परिवारास भेटण्यासाठी त्यांनी दुपारी 2 ते 4 या वेळे दरम्यानच्या काळात मुंबईत व ठाणे विरार नवीमुंबई ते पनवेल खोपोली या ठिकाणच्या कामानिमित्त असलेल्या हजारो गावकर्‍यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेची भेट घेवून शुभेच्छा दिल्या व बालपणीच्या आठवणी ताज्या ताज्या करून रंगून गेलेल्या या भेटीच्या सोहळ्यात जावलीकरही भारावून गेले…….

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!