मलेशिया येथील आय.एन.टि.आय. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात प्रा डॉ.संजय धोंडे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (अभिजित शिंगटे)
मेढा.दि.२९.मलेशिया येथील आय.एन.टि.आय. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात प्रा डॉ.संजय धोंडे यांचे आशियाई देशाच्या विकाासा बाबतचे डॉ . आंबेडकर यांचे विचार आणि योगदान पेपर चे सादरीकरण केले.
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे अर्थशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.संजय धोंडे सर यांना मलेशिया येथील INTI International University येथे २२जुलै २०२२ रोजी संपन्न झालेल्या फुले, शाहु, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सामील होण्याचे निमंत्रण आल्याने प्रा. डॉ. धोंडे यांनी मलेशियामधील या विद्यापीठांमध्ये जाऊन त्या ठिकाणी Importance of Economic Thoughts of Dr.B.R.Ambedkar In The Development of Asian Countries या विषयावर पेपर चे सादरीकरण केले.
जावली सारख्या दुर्गम भागातील कॉलेजचे प्राध्यापक असून सुद्धा प्रा.डॉ.धोंडे यांच्या माध्यमातून जावलीतील सुपुत्राची मलेशिया या ठिकाणी देखील छाप पडलेले आहे. या कार्यामुळे प्रा.डॉ.धोंडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे त्यांच्या या कार्यामुळे संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांतजी शिंदे, कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक घाटगे सर आणि सर्व प्राध्यापक महाविद्यालयाचे सर्व आजी-माजी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



