महाराष्ट्रसातारासामाजिक

मुख्यमंत्र्यांच्या जावलीतील बोंडारवाडी धरण मंजुरीसाठी वरिष्ठीय बैठकीस होतोय विलंब


केळघर.दि.१४ शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी केळघर येथे नुकताच भव्य मेळावा घेण्यात आला होता.या मेळाव्यात श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता कि बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्यासाठी प्रशासकीय बैठक लावावी सरकारने थोडा वेळ राखुन ठेवुन शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा हे जर सरकार करत नाही तर आम्ही पाणी लाँग मार्च काढु ( पाणी पदयात्रा ) व विधान भवनावर हजरोंच्या संखेने चालुन येवु.त्याच वेळी महाराष्ट्रातील सर्व संघटना पण या पदयात्रेसाठी आप आपल्या जिल्ह्यातुन पाठिंबा देतील व या पदयात्रे दरम्यान काही घडले तर त्यास राज्य शासन जबाबदार राहील.

बोंडारवाडी कृति समितीचे निमंत्रक,जलनायक कै.विजयराव मोकाशी साहेब यांचे स्वप्न बोंडारवाडी धरण व्हावे हि त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती पण त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या रक्षा व कलश संरक्षीत ठेवला असून जो पर्यंत बोंडारवाडी धरण मंजुर होत नाही तो पर्यंत त्यांच्या रक्षा विर्सजीत करणार नाही अशी धरण कृती समिती ५४ गावच्या नागरिकांसह सर्वांची भूमीका आहे.   ५४ गावांसह जावली तालुक्यातील सर्वांना आवाहन करण्यात येत आहे कि गावा गावातून व मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जावली तालुक्यातील लोकांनी बहुसंखेने या पदयात्रेत सहभागी होण्याची तयारी करण्याचे काम सुरू केले आहे. आपल्याला आर नाहीतर पारची लढाई सुरु करावी लागेल,वाटल होत आपल्या तालुक्याचे मा.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ताबडतोब हा प्रश्न निकाली काढतील बोंडारवाडी धरणा संदर्भात न्याय देतील पण आपला संपूर्ण जावली करांचा भ्रमनिरास झालाय. मा.उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तर मागील पंचवार्षीक मध्ये बोंडारवाडी धरण मंजुरीसाठी तत्वता मान्यता आणली होती,त्यामुळे आता धरण मंजुरीचे काम सहज सोपे झाले आहे जलसंपदा खाते देवेंद्र फडणविस साहेबांच्याकडे आहे पण नक्की मंजुरीचे काम होत का नाही ? तेव्हा हा लढा बोंडारवाडी कृति समितीच्या वतीने सर्वांच्या व भावी पिढीच्या अस्तीत्वाचा आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.     नुकतीच केळघर येथुन शिर्डीसाठी साई बाबांची पायी चालत दिंडी सोहळा निघाला असता या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी मेढा बाजारपेठेत धरणाला लवकर मंजुरी मिळावी यासाठी तालुक्यात जनजागृती करण्यासाठी धरण कृती समिती व ओम साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे यांच्या वतीने या दिंडीच्या माध्यमातून बोंडारवाडी धरणाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी असा संदेश लोकापर्यंत पोहविण्यासाठी प्रयत्न केला.

५४ गावातील नागरिकांसह संपूर्ण जावली तालुक्यातील लोकांनीआपआपल्या गावातुन बहुसंखेने पाणी लाँग मार्च या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कामाला लागा तयारी करा प्रत्यक्षात हा लढा जनतेच्या ताकतीने लढायचा आहे असे आवाहन बोंडारवाडी कृति समितीचे निमंत्रक आदिनाथजी ओंबळे यांच्या कडून करण्यात आले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!