कुसुंबी प्रतिनिधी दि.२३ सोशल मिडिया आज प्रत्येक ठिकाणी प्रभावी माध्यम होतं असताना याच माध्यमातून एकत्र होत सामाजिक कामही होत आहे. सातारा जिल्ह्यातील फेसबुकवरील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या फेसबुक सातारा या ग्रुपच्या माध्यमातून जावली तालुक्यातील दुर्गम,डोंगराळ भागातील शाळांना विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती निमित्त दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
फेसबुक सातारा च्या सदस्या व हिरकणी फाऊंडेशन च्या अध्यक्षा जयश्रीताई शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जावळीतल्या खिलारमुरा, भोगवलीमुरा, रेंगडीमुरा, निपाणीमुरा, गाळदेव, सह्याद्रीनगर व ढेबेवस्ती या शाळांना ब्लूटूथ स्पीकर्स, टेबल, खुर्च्या, वह्या, खेळाचे साहित्य आदी वस्तू देण्यात आल्या. या अनोख्या भेटीने दुर्गम गावांतील शेकडो लेकरांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी हास्य फुलले.
ही सर्व मदत उभी करण्यासाठी
फेसबुक सातारा समूहातील सर्व दात्यांचे सहकार्य लाभले.यामधे प्रामुख्याने सारथी सामाजिक विकास संस्थेकडून शिवजयंती तसेच वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुलांना वह्या देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये समूहाचे संचालक मंडळ, सदस्यवर्ग, तसेच जि.प. शाळेतील शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना शिकण्याची जिद्द व आवड असल्यास केवळ आर्थिक अडचणींमुळे ते प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांची स्वप्ने पूर्ण होऊन देशसेवेसाठी येणारी भावीपिढी निर्माण व्हावी हे एकच स्वप्न उरात बाळगून संस्थेतर्फे हा उपक्रम दरवर्षी शिवजयंती दिनी राबवला जात आहे. डाॅक्टर अजय वाडते. (ॲडमीन फेसबुक सातारा.)