महाराष्ट्रसातारासामाजिक

सौंदरी ता.महाबळेश्वर येथे मानिनी महिला संवाद मेळावा संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

महाबळेश्वर. दि.०९        सौंदरी ता.महाबळेश्वर येथे मानिनी महिला संवाद मेळावा संपन्न८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मानिनी फाऊंडेशन, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि १०५ गाव समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मानिनी महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला तापोळा विभागातील अनेक गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट, महिला सरपंच, महिला पोलिस पाटील, आशा सेविका आणि अन्य विविध वयोगटातील महिला उत्साहाने या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
महिला ही शक्ती आहे. महिला सबल झाली तर एक कुटुंब विकसित होईल. एक कुटुंब विकसित झाले तर गाव परिणामी, तालुका राज्य आणि देश पुढे जाण्यासाठी मदत होईल. यासाठी महिला सक्षमीकरण होणे आवश्यक आहे यासाठी महिलांचे गट करून त्यांच्या हाताला काम देऊन आर्थिक सुबत्ता आणासाठी काम करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. असे मानिनी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा डॉ भारती ताई चव्हाण यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र साठे साहेब अध्यक्ष खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देऊन महिलांचा जीवनाकडे पाहण्याचा आणि आपल्या प्रगतीसाठी दृष्टीकोन कसा असायला हवा यांची उत्तम माहिती दिली.

श्री बिपिन जगताप साहेब यांनी मधुमक्षिका पालन या विषयी कसे काम करता येईल या विषयाची ओळख करून दिली. श्री विद्याधर हिरमुखे साहेब यांनी आणि आपल्या उत्तम वक्तृत्व शैलीमध्ये महिलांनी विकास करायचा असेल तर मोठी स्वप्न बघून त्याला कृतीची जोड देऊन सरकारी नोकरीत मुलींनी प्रवेश घेतला पाहिजे यासाठी आवाहन केले. श्री युवराज पाटील साहेब आणि श्री रणवीर कुमार साहेब* यांनी महाराष्ट्र बँक आणि आय. डी.बी.आय बँक यांच्या विविध योजना समजावून सांगितल्या. 105 समाजाचे अध्यक्ष श्री घनश्याम आप्पा सकपाळ व 32 गाव समाजाचे अध्यक्ष श्री धोंडीबा महाराज सकपाळ यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. आणि समाज व्यवस्थेचा भाग म्हणून महिला सक्षमीरणासाठी महिलांना सहकार्य करण्याचे आणि महिलांसाठी विविध उपक्रम करण्याचे आश्वासन दिले.

सोळशी विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौंदरी ग्रामस्थ यांनी मंडप, जेवण तयारी खूप छान नियोजन केले होते. जिल्हा परिषद शाळा सौदरी या शाळांतील विद्यार्थी यांनी लेझिम आणि स्वागत गीत सादर केले. तर गोगवे हायस्कूल आणि आश्रम शाळा गोगवे येथील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
105 गाव समाज व्यवस्थेत महिलांसाठी पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तम नियोजन, जोरदार उपस्थिती आणि दर्जेदार मार्गदर्शन यामुळे महिला मेळावा यशस्वी झाला.
या मेळाव्याचे प्रस्ताविक श्री गणेश उतेकर सचिव 105 गाव समाज यांनी आणि सूत्रसंचालन श्री संजय संकपाळ यांनी केले.
यावेळी व्यापीठावर मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर वक्ते यांच्या बरोबर श्री डी के जाधव साहेब कार्याध्यक्ष १०५ गाव, श्री किसन दादा जाधव अध्यक्ष कोयना एज्युकेशन सोसायटी, श्री बी व्ही शेलार, संचालक कोयना एज्युकेशन. श्री लक्ष्मण जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते, श्री मंगेश सकपाळ, श्री अरुण कदम गुरुजी खजिनदार, श्री सुनील कदम सरपंच रामेघर श्री प्रकाश जाधव श्री अरूण सपकाळ सरपंच आणि ग्रामस्थ सौंदरी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!