महाराष्ट्रसातारासामाजिक

केळघर घाटात खोल दरीत जेसीबी कोसळला

केळघर. दि.२१.सातारा मेढा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात आज जेसीबी खोलदरीत कोसळल्याची घटना घडली.

केळघर घाटातील घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार आज रविवारी दुपारच्या सुमारास एक जेसीबी केळघर घाटातून चालला होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी खोलदरीत कोसळला. जवळपास 100 फूट खोलदरीत जेसीबीचे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.अपघातामध्ये जेसीबी चालक अक्षय कदम रा. वडुज त.खटाव यांनी जेसीबीतून बाहेर उडी मारत आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला.चालक बेशुध्द पडल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

या अपघातातील जे.सी.बी चालकास रेंगडी येथील सर्जेराव खुटेकर, सुनील खुटेकर, विठ्ठल खुटेकर, प्रकाश खुटेकर, स्वप्नील खुटेकर, विकास खुटेकर, विशाल खुटेकर, ऋषिकेश खुटेकर, राहुल खुटेकर, जगन खुटेकर, रमेश खुटेकर या युवकांनी खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करून 108 नंबरवर फोन लावून चालकाला सातारा येथे उपचारासाठी पाठविले.

या घाटातील रस्त्यावर काही ठिकाणी संरक्षण भिंती कठड्याची उंची कमी असल्याने हे अपघात वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी हा रस्ता अतिशय अरुंद आहे. यामुळेही अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा येथे नागरिकांमध्ये केली जात आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!