जावलीमहाराष्ट्र

तेटली येथिल जि.प.प्राथमिक शाळेत रंगली आषाढी वारी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

बामणोली. दि.२६.आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेटली ता जावली येथील शाळेमध्ये दिंडी चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा करून त्यांची पूजा करण्यात आली. लहान मुलांमध्ये देवांचे महात्म्य, परंपरा आणि श्रद्धा या उपक्रमांच्या माध्यमातून लहान मुलांना पटवून देण्याचा काम जिल्हा परिषद शाळा करत असतात.

तेटली गाव म्हंटले की प्रगत गाव म्हणून या गावाची ओळख आहे.कोणताही सण असो किंवा कोणता उपक्रम तेटली मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोच.अशी या गावाची ओळख आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हंटले की हसत खेळत शिक्षण हाच स्तुत्य उपक्रम तेटली या शाळेमध्ये आवडीने राबविला जातो.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेटली चे मुख्यद्यापक भालदार मॅडम, शिक्षक पवार सर,गोरवे मॅडम,तेटली गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

“आम्ही याच शाळेत शिकलो.जिल्हा परिषद शाळेमध्ये चागले संस्कार दिले जातात. आपले सर्व मराठी सण,उत्सव,जयंती मोठ्या आवडीने केले जातात, त्यामुळे मुलांना आपल्या आपल्या संस्कृती समजते.अश्या पध्दतीने आमच्या जि प च्या तेटली शाळेमध्ये संस्कार दिले जातात.”

अजित भोसले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तेटली ता.जावली जि. सातारा

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!