महाराष्ट्रसातारासामाजिक

सातारा पोलीस दलामार्फत हॉर्न व सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई


सातारा दि. 14 (जिमाका).जिल्हयामध्ये मागील 15 दिवसांपासून पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलामार्फत हॉर्न व सायलेन्सर मध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करणेत येत आहे. दंडात्मक कारवाई केले नंतर वाहन चालक हे स्वतःहुन असे हॉर्न व सायलेन्सर काढून टाकत आहेत.

या मोहिमेत जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा सातारा, वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर, वाहतुक नियंत्रण शाखा कराड शहर व जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडील वाहतुक पोलीस अंमलदार सहभागी झालेले आहेत. आज रोजी पर्यंत 125 वाहनांवर कारवाई करणेत आलेली. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे. इतरांना त्रास होईल अशा प्रकारचे हॉर्न व सायलेन्सर लावुन वाहने चालवु नयेत. अशा प्रकारे बदल केला असल्यास हॉर्न व सायलेन्सर स्वतःहुन काढुन टाकावेत.

नागरिकांनी वाहने पार्किंग करताना तसेच किरकोळ व्यवसायिकांनी त्यांचा व्यवसाय करताना रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही अन्यथा त्यांचेवर कायदेशिर कारवाई करणेत येईल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.

एखादा अपघात झालेनंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. अशा मदतीमुळे एखाद्या व्यक्तिचा मृत्यु टाळण्यास मदत होईल. अशा मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलीस चौकशीसाठी कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याबाबत दक्षता पोलीस दलातर्फे घेण्यात येईल व अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान करणेत येईल
00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!