महाराष्ट्रसातारा

शासनाचा निधी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्याने काम करुया- खासदार श्रीनिवास पाटील


स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

सातारा दि. 9 : शासनाचा निधी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सदस्य आणि अधिकाऱ्यांनी सहकार्याने काम करावे, अशा सूचना खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांनी केल्या.


जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


दिशा समितीपुर्वी सदस्यांनी व यंत्रणांनी अंतर्गत बैठक घ्यावी, अशा सूचना करुन श्री. पाटील म्हणाले, आपण सर्वांनी चांगले काम करुन दिशा समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला विकास करुया आणि राज्यासमारे एक आदर्श उभा करुया तसेच लोकांना काहीतरी चांगले दिल्याचा व काही लक्षात राहण्यासारखे चांगले काम केल्याचा आनंद आपण सर्वांनी घेऊया, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


0000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!