
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा. दि.०९. जि.प.प्राथमिक शाळा म्हाते बु.।। याठिकाणी कार्यरत असलेले हरहुन्नरी शिक्षक श्री. राजू मेश्राम यांना जावली पंचायत समितीच्या वतीने जावळी-सातारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुर्गम भागातील तळदेव मायणी याठिकाणी काम करत असताना ज्ञानरचनावाद तसेच बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले व लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण केल्या. म्हाते बु.।। याठिकाणी काम करतांना तंत्रस्नेही शिक्षक,शिष्यवृत्ती मार्गदर्शक, विविध वृत्तपत्रे व प्रातिनिधिक कवितासंग्रहातून कविता व इतर लेखन, विद्यार्थ्यांचा हस्तलिखित कवितासंग्रह,प्रयोगातून शिक्षण, इंग्रजी वाचन उपक्रम, हस्ताक्षर सुधार प्रकल्प,ऑनलाईन प्रश्नपेढी व व्हिडीओ निर्मिती, केंद्रस्तर शिक्षण परिषदांतून मार्गदर्शन, असे विविध उपक्रम राबवत शाळेच्या सर्वांगीण विकासात विशेष योगदान दिले.
याशिवाय एम.ए.,बी.एड. सेट अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली. या चौफेर कार्याची दखल घेत शिक्षण विभाग पंचायत समिती जावळी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
या यशाबद्दल शेती उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.हनुमंत शिंगटे, शिक्षणप्रेमी श्री आनंदराव(बापू)सपकाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपसरपंच श्री. अशोक सपकाळ,सरपंच श्री. कृष्णा कांबळे,श्री.राजाराम गोगावले, श्री. सयाजी कांबळे,श्री.पी.के.सपकाळ गुरुजी, शांताराम सपकाळ गुरुजी,सुरेश सपकाळ गुरुजी, विनोद शिंगटे,आनंदा सपकाळ,सखाराम साळुंखे, धोंडीराम सपकाळ, बजरंग दळवी,राजू सपकाळ,चंद्रकांत सपकाळ,निलेश सपकाळ,संदीप साळुंखे,संदीप सपकाळ, दाजीराम साळुंखे, बापू रांजणे,एकनाथ सावले,अंकुश पार्टे,अंकुश जंगम,गणेश पाटणे व इतर सर्व ग्रामस्थ, पालक व मुंबई मंडळ यांनी अभिनंदन केले.
गटविकास अधिकारी श्री. मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी श्री.संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.कल्पना तोडरमल व श्री. चद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख श्री. विजयकुमार देशमुख मुख्याध्यापक श्री. अंकुश शिंदे,सौ.मंगल जंगम, सौ.ज्योती दिघे,श्री.रवींद्र साबळे,श्री.जगदीश सोनकांबळे, रघुनाथ दळवी,सुभाष दळवी व सावली केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामसेविका सौ.दळवी,अंगणवाडी सेविका संजना शिंगटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सोनवलकर, म्हाते बु. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पानसकर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच श्री. सूर्यकांत पवार,शंकर बनसोडे, विशाल शेटे,किरण ढेबे,केशव अलट,प्रल्हाद डांगे,महादेव घोडके,तानाजी केमदारणे,आशीष साबळे,शरद गव्हाणे इ. शिक्षक मित्रांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.