शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा.दि.१७.
कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र जवान शंकर बसाप्पा उकलीकर यांना लेह येथे देशकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले. ते सैन्य दलात इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते.
आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन उकलीकर कुटुंबियांचे सांत्वन केले. शहीद जवान शंकर उकलीकर यांनी २२ वर्षे देशरक्षणाचे कर्तव्य बजावले. गावातील सामाजिक कार्यातही ते सहभागी असत. त्यांचे हौतात्म्य कायम स्मरणात राहील, तसेच उकलीकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी आश्वस्त केले. यावेळी शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी श्रद्धांजली वाहिली.
या समयी उकलीकर कुटुंबीय, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.