सातारासामाजिक

सातारा ते लोणंद मार्गावरीलअवजड वाहतुकीत बदल

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
सातारा दि.10. सातारा ते लोणंद या राज्यमार्गावर काळीमोरी रेल्वे पुलाजवळ मध्ये रेल्वे विभाग, पुणे यांच्याकडून नवीन रेल्वे पुल बांधण्यात येत आहे. तेथील सध्याचा वाहतुकीचा पुल काढून टाकण्यात येणार आहे व दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी 13 ऑक्टोंबरपर्यंत अंतर्गत वाहतुकीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बदल केला आहे.
पुणे-लोणंद मार्गे साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतूक लोणंद वरुन खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर हायवे वरुन सातराकडे जाईल. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरुन न वळवता सरळ पुणे बेंगलोर महामार्गाने शिरवळ मार्ग लोणंदकडे जाईल. फलटण वरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने फौजी ढाबा येथून तडवळे स.वा. मार्गे पिंपोडे बु. ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे साताराकडे जातील.
लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे स.वा. मार्गे पिंपाडे बु. ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन मार्गे सातारा/कोरेगावकडे जातील. सातारा/कोरेगाव कडून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने वाग्देव चौक वाठार स्टेशन मार्गे पिंपोडे बु. ते तडवळे स.वा. ते लोणंद/फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील. आदर्की फाटा येथील फौजी ढाबा ते वाग्देव चौक, वाठार स्टेशन हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!