महाराष्ट्रसातारासामाजिक

कर्तव्यात कसूर करणाऱ्या रुईघर सजाचे गाव कामगार तलाठ्यावर कारवाई करावी…

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

मेढा.दि.२८.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) गटाची वतीने रुईघर सजाचे गाव कामगार तलाठी श्री धनावडे यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी जावली तहसीलदार राजेंद्र पोळ यांना जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

          या निवेदनाद्वारे जावली तहसीलदार यांच्या कडे मागणी करत वारस नोंदी संदर्भात रुईघर सजाचे गाव कामगार तलाठी यांनी एका व्यक्तीचे काम अपूर्ण ठेवले आहे.तसेच ते अनेक लोकांची कामे वेळेत पूर्ण करत नाहीत,आपले काम जबाबदारीने न करता लोकांना रोज तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक कारणांमुळे लोकांची कामे लांबणीवर पडतात.काही लोकांच्या दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्यांनी त्या लोकांना वेळेवर सांगितले तर लोक आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करून देतील,असे अनेक आरोप जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी केले आहेत.
रुईघर सजाचे गाव कामगार तलाठी श्री धनावडे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून ते कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.(A) सातारा जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!