स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – पवार (सर)
कास.दि.३०. सालाबाद प्रमाणे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन व शांतिब्रह्मनाथ महाराज जल समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मौजे गोंदेमाळ तालुका जावळी येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मृदंगमणी म्हणून सुभाष महाराज मिस्त्री, बबन महाराज सपकाळ, लक्ष्मण महाराज सोनवणे यांची साथ लाभली. काकडा व हरिपाठ सुरेश महाराज पार्टे, हनुमंत महाराज पार्टे, अशोक महाराज शिंदे यांनी रोज उत्साहात संपन्न केला. कार्यक्रमास गवई म्हणून अभिषेक महाराज कराड, विजय महाराज शेलार, हनुमंत महाराज पार्टे यांनी साथ केली. चोपदार म्हणून आनंदा पार्टे, लक्ष्मण पार्टे, ज्ञानदेव पार्टे यांनी काम पाहिले.
सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. यामध्ये सागर महाराज पवार यांचे शिवचरित्रावरील कीर्तन विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच दीपोत्सव व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. काल्याचे किर्तन उत्तम महाराज बडे आळंदी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी समाजसेवक विजय सावले यांनी महाप्रसादाचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांताराम पार्टे, सुरेश पार्टे, विजय शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.



