क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्था- मुंबई यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र —-
मुंबई.दि.८. क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्था- मुंबई यांच्या वतीने दिनांक ८ जून २०२४ रोजी मानखुर्द पश्चिम इमारत क्रं- ९०, मुंबई-४३,विशाल भोगे साहेब यांच्या ऑफिस जवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ ३५० ते ४५० एम.एल. रक्तच काढून घेतले जाते. रक्तदान केल्यानंतर लिक्विड घेताच रक्तवाढीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे वयवर्षे १८ ते ६५ यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केले पाहिजे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळते.प्रत्येकी तीन महिन्यांनी पुरुष आणि चार महिन्यांनी स्त्रिया रकदान करू शकतात.
रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवावा यासाठी दिनेश बाळू पवार- क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्था- मुंबई जिल्हा अध्यक्ष यांनी परिसरातील नागरिकांना उपस्थित राहून रक्तदान करण्यासाठीआवाहन केले आहे.