जावलीसातारा

विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून जिद्दीने करिअर घडवावे- प्रा. डॉ. नितीन कदम सर

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-


कुसुंबी. दि.१७.मेढा येथे दिशा अकॅडमी व वेदांत क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी ,बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन एस. एस. पार्टे बहुउद्देशीय हॉल येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीचे पूजन आणी दीप प्रज्वलन वेदांत क्लासेसच्या संचालिका प्रा. रेखा वांगडे आणि प्रा. कोमल साळुंखे व उपस्थित पालक विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या सोबतीने करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. महेश ढेबे सर यांनी केले तसेच प्राध्यापक अनुपम गांधी सर यांनी दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स तसेच वेदांत क्लासेस बद्दल उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालक वर्गाला माहिती दिली.


दिशा अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.नितीन कदम सर यांनी विद्यार्थी व पालकांना सायन्स क्षेत्रातील विविध करिअर बद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास कसा करावा आणि एखादे विशिष्ठ करियर घडवन्यासाठी कसे प्लॅनिंग करावे याबद्दल प्रेजेंटेशन सह सखोल मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमासाठी दिशा अकॅडमी व वेदांत क्लासेस चे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची शेवटी वेदांत क्लासेस चे संस्थापक श्री. संजय वांगडे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक यांचे आभार मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!