
धैर्यशील दादा कदम यांच्या हाती भाजपा जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे आल्यापासून त्यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि कर्तृत्ववान स्वभावाची झलक संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्हा हा गेली काही वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारांचा म्हणून गणला जात होता.परंतु २०१४ साली आलेल्या मोदी लाटेनंतर इथं भारतीय जनता पक्षाची मुळे रुजायला सुरुवात झाली. जिल्ह्यात भाजपाचे आमदार खासदार तयार झाले, अन संघटन बांधणी जोर धरू लागली. पण जिल्ह्यातील तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांना जोडणारा जो दुवा हवा होता तो जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या रूपाने मिळाला.
पद हे जबाबदारी असते हा विचार मनात घेऊन निवडीच्या घोषणेपासूनच पायाला भिंगरी बांधून धैर्यशील कदम यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गाव जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपाच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकसंध करत जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची आखणी केली त्या माध्यमातून नवे बळ निर्माण झालं. गेली अनेक दिवस भाजपाच्या वतीने सुरू असलेले अनेक उपक्रम धैर्यशील कदम यांच्याच नेतृत्वात यशस्वी होताना दिसत आहेत. मेरी माटी मेरा देश च्या माध्यमातून गावागावात संपर्क साधला, महाविजय २०२४ च्या अंतर्गत सातारा जिल्ह्यात विविध नेत्यांचा दौरा झाला तेव्हा भाजपाची वाढलेली ताकद दिसून आली. पक्षाने दिलेली जबाबदारी अगदी मनापासून राबवण्यात धैर्यशील कदम यांनी कोणतीही कसून ठेवलेली नाही असे दिसून येते.
येणाऱ्या सर्व ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत निवडणूकांच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी धैर्यशील कदम हे घेत असलेली मेहनत आणि आजपर्यंतचा त्यांचा राजकीय अनुभव पाहता जागोजागी भारतीय जनता पार्टीला यश मिळण्याची शक्यता प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.