
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी —- देवेंद्र साळुंखे
बामणोली.दि.०६.जलजीवन मिशन अतर्गत बामणोली भागातील ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण पार पडले. या वेळी जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सदर प्रशिक्षणासाठी 14 ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्यासह पाणी पुरवठा स्वच्छता समितीतील अन्य 3 सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर CRPअसे प्रति ग्रामपंचायत 7 लोकांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
तसेच बामणोली भागातील कसबे बामणोली, शेंबडी,अंधारी,मुनावळे,उमरेवाडी,कारगाव,वेळे, तेटली, केळघर साळोशी,कोळघर, आपटी, निपाणी, वाकी, एकीव आदी ग्रामपंचायत मधील लोक उपस्थित होते.
या प्रशिक्षामध्ये शुद्ध गुणवत्ता पुर्ण पाण्याचे महत्व, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती, पाणी पट्टीचे महत्व,जलसंधारण आदी विषयाबाबत अजय राऊत पाणी व स्वच्छता विभाग ,जिल्हा परिषद सातारा यांनी मार्गदर्शन केले. तर प्रशिक्षणात स्वच्छ भारत मिशन विषयी पंचायत समिती जावली चे रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मनवेल बारदेस्कर संस्थेचे सतिश कुभार यांनी जलजीवन मिशन योजनेचे महत्व पटवुन दिले.
या प्रशिक्षणाच्या वेळी बामणोली सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच रमेश पवार, माजी सरपंच चंद्रकांत संपकाळ, तेटली सरपंच आर.डी.भोसले, आपटी सरपंच बाबुराव शिंदे, तर ग्रामसेवक आर.बी.राऊत पि.आर.माने,एस.वाय.जाधव, सुधिर जाधव, युवराज पवार,रसुल दिवान आदी लोक उपस्थितीत होते.