धार्मिकसातारा

तिर्थक्षेत्र आंबेघर येथे कार्तिकी एकादशीला विठ्ठल नामाच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

मेढा दि.२१.जावली तालुक्यातील तिर्थक्षेत्र आंबेघर तर्फ मेढा येथे उभारलेल्या प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलधामामध्ये कार्तिकी एकादशीला वारीला दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच या एकादशी दिवशी येथे महापूजा, भजन, किर्तन या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन ह.भ.प.प्रविणजी महाराज शेलार यांनी केले आहे.

जावळी तालुक्यातील भाविक भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी, याकरिता तिर्थक्षेत्र आंबेघर येथे प्रतिपंढरपूर विठ्ठलधामची उभारणी करण्यात आली याठिकाणी या वर्षीच्या कार्तिकी वारीपासून दर वर्षी दिंडी सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाई वांगडे, ज्ञानदेव रांजणे, उपस्थित राहणार आहेत.

तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने गुरुवार (ता. २३) रोजी विठ्ठलधामामध्ये पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा आमदार महेश शिंदे,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पोलिस अधीक्षक समीर शेख, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्या हस्ते होणार असून काकड आरती,भजन,हरिपाठ,कीर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजनही याठिकाणी करण्यात आले आहे.

जावळी तालुक्यातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या काळात शेतातील कामांमुळे इच्छा असतानाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही. अशा भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच व्हावे म्हणून तिर्थक्षेत्र आंबेघर येथे स्थापन केलेल्या विठ्ठलधामामध्ये वारी सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या वर्षी प्रथमच सुरू होणाऱ्या वारी सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहून वारीचा आनंद घ्यावा,असे आवाहन विठ्ठलधामचे संस्थापक ह.भ.प.प्रविणजी महाराज शेलार तसेच ग्रामस्थ मंडळ आंबेघर यांनी केले आहे.

 जावली तालुक्यात प्रथमच तिर्थक्षेत्र आंबेघर येथे कार्तिक वारी सोहळ्याचे आयोजन केले असून जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय तसेच भाविकांनी उपस्थित राहावे.

ह.भ.प. प्रविणजी महाराज

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!