सातारासामाजिक

राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करावा

-नितिन उबाळे

स्टार ११ महाराष्ट्र ———

सातारा दि.22. राज्य निवडणूक आयोग यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संपन्न केला असून त्यामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी समितीकडे माहे ऑक्टोंबर 2023 मध्ये अर्ज सादर केलेले आहेत.
सदर अर्जावर संबंधित निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत किंवा कसे याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची समितीने छाननी केली असता, जे उमेदवार हे आरक्षित (मागासप्रवर्ग) जागेवर निवडून आलेले नाहीत किंवा ज्या संबंधित अर्जदारांनी निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा या कार्यालयाकडे सादर केला नसल्यामुळे संबंधित प्रकरणावर निर्णय घेता येत नाही.
तसेच सर्व प्राप्त अर्जापैकी अद्याप निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा समितीस सादर न केल्यामुळे सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणीचे नियम 2012 मधील नियम 17 (2) / (3) मधील तरतुदीनुसार निकाली काढण्यात येतील याची सर्व निवडणुकीमध्ये सहभागी उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे. सबब सर्व संबंधित उमेदवारांनी आपले प्रकरणी विहित कालमर्यादेत जात पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर आरक्षित (मागासवर्ग) जागेवर निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा या कार्यालयास सादर करावा.
तरी या संबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवडणुकीमध्ये राखीव जागेवरती निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर समितीस सादर करावेत, असे आवाहन नितीन उबाळे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.
0000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!