सातारासामाजिक

राष्ट्रभाषा समिती वर्धा द्वारा प्रा सुधाकर शिंदे यांना उत्कृष्ट हिंदी सेवा पुरस्कार 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —— राजेश सोंडकर [ महाबळेश्वर ]

महाबळेश्वर.दि. २८. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसार कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल महाबळेश्वर येथील गिरिस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा सुधाकर शिंदे यांना महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा या शासकीय संस्थेमार्फत उत्कृष्ट हिंदी सेवी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वर्धा येथील समितीच्या पंडित रामेश्वर दयाल दुबे सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला .सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाचे प्रधानमंत्री डॉ.हेमचंद्र वैद्य , प्रमुख पाहुणे डॉ.सुलतान हरडू ( हरियाना) बालभारती पुणे पुर्व विशेषाधिकार डॉ.अलका पोतदार , सेवाग्राम मेडिकल कॉलेज वर्धाचे प्रमुख डॉ.ओ .पी.गुप्ता संयोजक डॉ.रत्ना चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा सुधाकर शिंदे महाबळेश्वर येथील गिरिस्थान कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.या पुर्वी ही विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.इ ११वी ,१२वी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे संपादक मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

प्रा शिंदे अनेक वर्षांपासून हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.या पुरस्काराबद्दल महाबळेश्वर नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री योगेश पाटील, प्राचार्य श्री के.बी.ढाणक, कार्यालय प्रमुख श्री संजय पाटणे,सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा सुधाकर शिंदे यांच्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!