सातारासामाजिक

श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून केडांबे येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——–

मेढा. दि.२८. केडंबे ( ता . जावली ) येथील आई श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि निराधार महिलांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.कुटुंब आणि समाजाच्या प्रगती बरोबरच सुसंस्कृत आणि कार्यक्षम भावी पिढी घडविण्यासाठी महिलांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी समाज्यातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे असे आवाहन आई श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ओंबळे यांनी केले.

यावेळी उपसरपंच महादेव ओंबळे,नारायण सुर्वे,बजरंग चौधरी,विलास शिर्के,सुरेश कासुर्डे,श्रीरंग बैलकर,जगन्नाथ जाधव राजूदादा जाधव यांच्यासह बोंडारवाडी धरण कृती समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शहीद तुकाराम ओंबळे, कै. जलनायक विजयराव मोकाशी साहेब आणि आई श्री. महालक्ष्मी देवीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये केडंबे गावातील सौ. शांताबाई श्रीपत सुतार ( संस्कृतिक कौशल्य ), श्रीमती सुलाबाई जगन्नाथ ओंबळे -माजी सरपंच ( गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रथम पारितोषिक दिल्ली ),सौ. कविता विजय ओंबळे ( सामाजिक कार्यकर्ते – केडंबे ), श्रीमती सुनीता राजाराम ओंबळे – आरोग्य विभाग ( पती पश्यात आर्थिक संकटावरून मात करून कुटूंब सांभाळून 3 मुलांना उच्च शिक्षण ) अशा गावातील महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच जावळी तालुक्यातील रणरागिणी सौ. साक्षी (उषा ) उंबरकर, सौ. विद्या सुर्वे, सौ. सुधा चिकणे यांचा बोंडरवाडी धरण कृती समितीच्या कामाच्या विशेष योगदानासाठी सत्कार कारण्यात आला. तर तालुक्यातील डांगरेघरचे सरपंच अमोल आंग्रे व चोरांबे गावचे सरपंच विजय सपकाळ यांनी त्यांच्या गावासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल सत्कार कारण्यात आला.

गावांतील युवक, जेष्ठ नागरिक, आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.केडंबे येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सदरच्या कार्यक्रमाला विशेष योगदान दिले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन आनंदा लक्ष्मण ओंबळे यांनी केले, आदिनाथ ओंबळे यांनी स्वागत केले केले.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!