मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेमुंबई व नवी मुंबई

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी जवानांना मानवंदना

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——

मुंबई.दि.२६. 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पोलीस स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण होत असून या हल्ल्याने मुंबई पोलीस दलाची जी हानी झाली ती कधीही भरून येणे शक्य नाही. या निमित्ताने या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून आम्ही तुमच्या सदैव सोबत असल्याची खात्री दिली.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!