
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——- अजित जगताप सातारा
सातारा. दि:२८. सातारा शहरा नजीक असलेल्या शाहूपुरी परिसरात आज ऐतिहासिक क्रांती घडली. शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच गंगासागर कॉलनी परिसरात अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण होत आहे . त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सर्वधर्मसमभाव याचा आदर्श घेऊन श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळ गंगासागर कॉलनी, शाहूपुरी ,सातारा या ठिकाणी विधायक उपक्रम राबवण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी प्रथमच महिलांनी यशस्वीरित्या गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा केला. त्यानंतर शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
या विधेयक उपक्रमात बरोबरच जातीय सलोखा कायम टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला श्री गणेश महिला गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ. उज्वला बाबर, खजिनदार सौ. मेघा चांदणे, सचिव सौ. अमृता माने, जेष्ठ मार्गदर्शक श्री बा. ग. धनावडे, अशोक चौगुले, अजित जगताप,श्रीमती संजीवनी माने,सौ. मालन सोनावणे, सौ. जयश्री गोडसे, सौ.उर्मिला पवार,रोहित जाधव, रोहन मेंनकर, संतोष सोनावणे, नारायण जाधव, अशोक जावळे, अशोक चौगुले, निर्वेध पवार, सौ.संजीवनी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जाधव, तुषार जोशी, आप्पा गोसावी, नितीन तरडे, अक्षय जाधव, रमेश इंदलकर, नारायण जाधव व गंगासागर महिला गणेशोत्सव मंडळाच्या महिला पदाधिकारी व गंगासागर कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेला महात्मा फुले यांच्या विचाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते भारत जगताप यांनी मार्गदर्शन केले.