शैक्षणिकसातारा

तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेत जवळवाडी शाळेचे यश

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——–

 

तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेत जवळवाडी शाळेचे यश

मेढा.दि.२९.  सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धा ( लहान गट) यामध्ये जि.प. प्राथ. शाळा जवळवाडी ता.जावली येथील विद्यार्थ्यांच्या लेखणीला पहिल्याच प्रयत्नात सुयश प्राप्त झाले आहे.

‘माझे गाव- आदर्श गाव ‘ या विषयावर ग्रामस्थांशी सुसंवाद साधून इ.१ ली ते इ.४थी मधील मुलांनी माहिती गोळा करुन स्व अक्षरात लेखन केले. या लेखनासाठी गावातील गामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच,सदस्य व भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष व आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले. तसेच जवळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता जाधव,श्री.संदीप सुतार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळवून जवळवाडी गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशाबद्दल जावली तालुक्याचे गट -शिक्षणाधिकारी संजय धुमाळ  विस्ताराधिकारी श्रीम्.तोडरमल,श्री.कर्णे साहेब,केंद्रप्रमुख सौ. संकपाळ तसेच सरपंच सौ.सुरेखा मर्ढेकर, उपसरपंच शंकर जवळ विलासबाबा जवळ, सतिश मर्ढेकर,अध्यक्ष सागर जवळ,समिती अध्यक्ष सौ. सुजाता मर्ढेकर ,पालक व ग्रामस्थांनी या यशाबद्दल गुरूजन व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!