सातारासामाजिक

जिल्ह्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा उमेदवारांसाठी सारथीमार्फत मोफत प्रशिक्षण

लाभ घेण्याचे आवाहन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —-
सातारा दि.११. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत जिल्ह्यातील लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी) उमेदवारांसाठी रोजगार, स्वयंरोजगारक्षम कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा किंवा 02162-239938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!