स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——– अभिजित शिंगटे
मेढा.दि.१२. सभासदांचे हित पाहणाऱ्या आपल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्व सहकारी सभासदांनी आपली स्वप्न पूर्ण केली असून आता मात्र बँकेने आपले रूप बदलण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे त्यास सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक सहकारीबँकेचे चेअरमन श्री राजेंद्र बोराटे यांनी केले आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने आयोजित कॅलेंडर व डायरी वाटप कार्यक्रम मोजे फलटण येथे करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सातारा चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळी अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक या वर्षी शताब्दी महोत्सव साजरा करीत असून जिल्यातील संपूर्ण सभासदांनी बँकेची प्रगती नेहमीच आघाडीवर राहील या करीता एकत्रित येऊन आपली ताकद पणाला लावली पाहिजे.आपली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक विविध प्रकारच्या सोईसुविधा सभासदांना देत आहे.बँकेच्या माध्यमातून आता सभासदांना सातारा जिल्हा व्यतिरिक्त पुणे,मुंबई येथे घर बांधणी तसेच फ्लॅट खरेदी कामी अत्यंत कमी व्याजदर पद्धतीने कर्ज अदा करण्यात आले आहेत.अचानक आलेल्या अडी अडचणी करीता विना जामीन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.बँकेने ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू केले असून भविष्यात ज्या काही त्रुटी आहेत त्या सुध्दा पूर्णत्वास नेण्यासाठी संचालक मंडळ,आणि बँकेचे अधिकारी प्रयत्नशील असून पुढील काळात “बँकेची प्रगती ,सभासदांची उन्नती”झालेली पहावयास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी व्हाईस चेअरमन शशीकांत सोनवलकर, संचालिका सौ पुष्पलता बोबडे,सौ.निशा मुळीक, शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाषराव ढालपे, शिक्षक संघाचे अध्यक्ष द .बा .पवार, दिलीप मुळीक शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष कोळेकर, जुनी पेन्शन हक्क संघटना अध्यक्ष निलेश जाधव, भगवंत कदम,शिक्षक समितीचे सरचिटणीस निलेश कर्व, गणेश तांबे, कराड पाटण सोसायटी चे संचालक प्रविण मोरे,एम.डी.दडस,कुष्णात कुंभार, संभाजी कदम, समितीचे महिला आघाडी अध्यक्षा जयश्री कदम, संभाजी बिटले,नवनाथ गावडे, राजेंद्र निगडे, संदिप कोळेकर, हणमंत चिंचकर, मधुकर अलगुडे, तानाजी वाघमोडे, संजय देशमुख, उपस्थित होते